'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय 
देश

'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय

वृत्तसंस्था

नोएडा : एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या 23 वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची ती राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्येच गोळ्या घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागे तिचा प्रियकर असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठातून पदवी घेतलेली अंजली राठौड (वय 23) नोएडातील सेक्‍टर 62 मध्ये राहात होती. सेक्‍टर 62 मधील शताब्दी रेल विहार सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर इतर सहा मुलींसोबत अंजली राहात होती. मूळ हरियानातील यमुना नगरमधील असलेली अंजली जून 2016 पासून नोएडामध्ये नोकरी करत होती. बुधवारी सकाळी अंजलीच्या प्रियकराने तिला फोन केला. त्यानंतर अंजली तळमजल्यावर आली. तेथेच काही वेळाने ट्युशनला जाणाऱ्या अंजलीच्या रूममेटला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. त्यानंतर तातडीने अंजलीला फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार चित्रित झाला आहे. पोलिसही आणि तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 'आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून प्राथमिक तपासाअंती या हत्येमागे अंजलीचा प्रियकर असण्याची शक्‍यता आहे. आम्ही त्याला लवकरच अटक करणार आहोत', अशी माहिती नोएडाचे पोलिस अधिक्षक अरुण कुमार सिंह यांनी दिली.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अंजलीच्या मागून येणाऱ्या एका व्यक्तीने हत्या केल्याचे दिसत आहे. मात्र कॅमेऱ्याची गुणवत्ता चांगली नसल्याने प्रतिमा अस्पष्ट दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT