Tajmahal
Tajmahal 
देश

ताजमहाल हे शिवमंदिर नाही; पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र 

वृत्तसंस्था

आग्रा : ताजमहाल ही मुघल बादशाह व त्याची पत्नी मुमताज महल यांची कबर असल्याचे प्रतिज्ञापत्र पुरातत्त्व विभागाने आज आग्राच्या स्थानिक न्यायालयात सादर केले. त्यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या ताजमहाल ही कबर की शिवमंदिर, या वादावर पडदा पडला आहे. 

या संदर्भात राजेश कुलश्रेष्ठ यांनी स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीत पुरातत्त्व विभागाच्या वतीने वकील अंजनी शर्मा यांनी हे प्रतिज्ञपत्र सादर केले. ताजमहाल ही कबर नसून ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहाल असल्याचा दावा करत सादर करण्यात आलेले सगळे पुरावे काल्पनिक असल्याचे शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले; तसेच बेगम मुमताजच्या स्मृतीसाठी बादशहा शाहजहानने ताजमहाल बांधल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

ताजमहालचा कुठला भाग पर्यटकांसाठी खुला असावा व कुठला नसावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याआधीच आदेश दिल्याचा दाखला देत त्यावर आता नव्याने विचार करण्याची गरज नसल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे. 

पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या पुस्तकापासून हा वाद सुरू झाला. ताजमहाल हा तेजोमहाल असल्याचे सांगत ओक यांनी ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असल्याचा दावा केला आहे. ते सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले. मात्र, हे पुरावे काल्पनिक असल्याचा दावा पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून सुरू झालेल्या या वादात राजकारणी त्यात भर टाकत आले आहेत. त्यामुळेच आग्रा येथील न्यायालयात ताजमहाल हे मूळ शिवमंदिर असल्याच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनाही ताजमहालाजवळील दसरा घाटावर शंकराच्या आरतीचे आयोजन करते. हे हिंदू मंदिर असल्यामुळे ताजमहालमध्ये नमाज पढण्यात येऊ नये, अशी मागणीही अनेक हिंदू संघटनांकडून वरचेवर होत असते. ताजमहालाला शिवमंदिर घोषित करावे आणि सत्यच पाहण्यासाठी या वास्तूचे बंद असलेले सर्व भाग खुले करून जे दिसेल त्याची नोंदणी करावी, अशी मागणीही एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. 

ताजमहाल ही ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू असून, ती बघायला जगभरातून पर्यटक येतात. त्यामुळे ती अशा वादाचा विषय होऊ नये. ताजमहाल भारताच्या इतिहासाचा भाग असून, ते देशाचे एक प्रतीकही आहे. 
- प्रल्हाद अगरवाल, अध्यक्ष, आग्रा टुरिस्ट वेल्फेअर चेंबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT