National Youth Day 2024 esakal
देश

National Youth Day 2024 : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशीच का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन?

भारतात दरवर्षी १२ जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते.

Monika Lonkar –Kumbhar

National Youth Day 2024 : भारतात दरवर्षी १२ जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर, १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. ही परंपरा आजतागायत कायम आहे. आजच्या दिवशी देशात सर्वत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आणि युवा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

हा दिवस साजरा करण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे आजच्या तरूणाईमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांबदद्लचे महत्व वाढवणे हा आहे.

१२ जानेवारीलाच का साजरा केला जातो युवा दिन?

स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि त्यांचे जीवन यांमधून तरूणांना प्रेरणा मिळते. मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानून स्वामी विवेकानंद यांनी तरूणांसाठी भरीव कार्य केले होते. स्वामी विवेकानंद हे धर्म, इतिहास, तत्वज्ञान, कला, साहित्य आणि सामाजिक शास्त्रातील तज्ज्ञ होते.

स्वामी विवेकानंद यांना भारतीय शास्त्रीय संगीताची विशेष आवड होती. त्यांचे विचार आणि कार्य आज ही तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. विवेकानंद यांचे हे अनमोल विचार आणि त्यांचे जीवन तरूणांना नेहमीच प्रोत्साहन देते.

स्वामी विवेकानंद यांचे हे अनमोल विचार आणि कार्य तरूणाईमध्ये असेच जागृत रहावेत, यासाठीच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी म्हणजे १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय युवा दिनाचे खास महत्व

देशाचे भविष्य हे तरूणाईवर अवलंबून आहे. उद्याचा विकसित भारत हा तरूणांच्या हाती आहे, असे नेहमी म्हटले जाते आणि हे खरे देखील आहे. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशातील तरूणाईचे योगदान असते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तरूणांना योग्य मार्गदर्शन मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे, या राष्ट्रीय युवा दिनाचे खास असे महत्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT