sakal
देश

देशभर सर्व्हे : कोरोनाच्या परिणामाची गोळा केली जातेय आकडेवारी

कोरोना विषाणू व त्याच्या नियंत्रणासाठी लावलेल्या निर्बंधामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला असून रोजगार गेला आहे

निलेश डोये

नागपूर : कोरोना विषाणू व त्याच्या नियंत्रणासाठी लावलेल्या निर्बंधामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला असून रोजगार गेला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खराब झाल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. केंद्र सरकार मात्र, हे आरोप फेटाळत आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या जीवनमानावर काय परिणाम झाला, किती लोकांचा मृत्यू झाला याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देशभर सर्वेक्षण करण्यात येत आहे.

दीड वर्षापूर्वी कोरोना विषाणूने देशात प्रवेश केला. अल्प काळात त्याने संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात घेतले. त्याचा नियंत्रणाकरिता संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला. जवळपास चार महिने ही स्थिती होती. त्यानंतर काही प्रमाणात सवलत देण्यात आली. तर २०२१ ला पुन्हा त्याने डोके वर काढले. ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर होती. सर्वाधिक जीव हानी या दुसऱ्या लाटेतच झाल्याचे सांगण्यात येते. पहिल्या लाटे जीवहानी पेक्षा आर्थिक नुकसान अधिक झाले.

अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडले. परिणामी अनेकांचा रोजगार. लोकांवर उपासमारीची वेळ आली. परराज्यात गेलेल्या नागरिकांना आपल्या राज्यातील घरी जाण्यासाठी हजारो अंतर पायी चालावे. रस्त्यांवर वाहनापेक्षा पायी चालत असल्याचे चित्र दिसत होते. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती ओढवली असून मृत्यूचे आकडेही सरकार लपवीत असल्याचा असल्याचे आरोप झाले.

ऑक्सिजन अभावी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अनेकांचा असला तरी केंद्र सरकारने एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नसल्याचे संसदेत सांगितले. त्यावरून केंद्र सरकारवर चांगलीच टीका झाली. आता केंद्र सरकारतर्फे कोरोनामुळे झालेल्या परिणामाची माहिती गोळा करीत आहे. अर्थ व सांख्यिकी विभागाच्या माध्यमातून ही माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वे करण्यात येत आहे. केंद्र सरकारे १३ पानाचा अर्ज नमुना दिला आहे.

ही माहिती गोळा करण्यात येत आहे

नाव, वय, लिंग, वैवाहिक स्थिती, मार्च २०२० पूर्वीच्या ३६५ दिवसातील उत्पन्न, शैक्षणिक स्थिती, कोरोना आजार होता का, इतर आजार, पहिला, दुसरा डोस झाला का, आदी माहितीचा यात समावेश आहे. त्याच प्रमाणे रोजगार प्रकार, किती उत्पन्न होते, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला का, ऑक्सिजनची गरज होती, मिळाला की, शेतकऱ्यांशी संबंधित माहिती सुद्धा आहे. जवळपास १०० मुद्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सप्तपदी, सात वचनं... पण अवघ्या १६८ तासांतच नात्याचा झाला शेवट; जोडप्यानं का घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?

Latest Marathi News Live Update : मुंबईला अनेक दशकांपासून वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांचा सामना करावा लागला - पीयूष गोयल

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT