Naveen Patnaik 
देश

Fathers Grave : मुख्यमंत्री असावा तर असा! विकासासाठी पाडली वडिलांची समाधी 

Sandip Kapde

संपूर्ण देशात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे नाव चर्चेत आहेत. मुख्यमंत्री हवा तर असा, अशी चर्चा देशात सुरू आहे. एकीकडे पुतळ्यांवरुन राजकारण करणारे नेते तर दुसरीकडे विकासासाठी स्वत:च्या वडीलांची समाधी पाडणारे नवीन पटनायक यांनी वेगळा संदर्भ निर्माण केला होता.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरीच्या विकासासाठी २०१९ मध्ये त्यांचे वडील आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांची समाधी पाडण्याचे आदेश दिले होते. पुरी येथील स्वर्गदर येथील समाधी पाडण्याचा उद्देश स्मशानभूमीत अधिक जागा निर्माण करणे आणि तीर्थक्षेत्र शहरातील सुशोभीकरण मोहिमेला गती देणे हा होता.

खासगी सचिवांनी केला खुलासा

१३ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्र्यांसोबत असलेले त्यांचे जवळचे स्वीय सचिव व्हीके पांडियन यांनी मंगळवारी दुबईत ओडिया समुदायाला संबोधित करताना हा खुलासा केला. ते म्हणाले, "आता स्मारकाऐवजी स्वर्गद्वारमध्ये बिजू बाबूंच्या नावाचा फक्त फलक आहे."

अनेक हिंदूंना स्वर्गद्वार येथे त्यांच्या प्रियजनांवर अंत्यसंस्कार करायचे असतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे की तेथे अंत्यसंस्कार केल्यास मोक्ष प्राप्त होऊ शकतो. बिजू पटनायक यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक स्थानिक संस्थेने १७ एप्रिल १९९७ रोजी स्वर्गद्वार येथे बांधले होते. मात्र स्मशानभूमीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित झाला होतो. पांडियन यांनी स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाची योजना मुख्यमंत्र्यांना दाखविली होती. यावेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या वडिलांची समाधी पाडण्याचे आदेश दिले होते.

पांडियन म्हणाले, पटनायक म्हणाले होते, त्यांचे वडील 'लोगों के दिल में रहते हैं, पत्थर में नहीं'. पुरीचा स्वर्गद्वार हा राज्यातील पहिला परिवर्तन प्रकल्प होता. लोकांचा रोष टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पहाटेच स्मारक पाडण्याचे आदेश दिल्याचे पांडियन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT