देश

भज्जी उतरणार राजकीय मैदानात? सिद्धूंनी फोटोला दिलेल्या कॅप्शनने चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड: पंजाब विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यावरच येऊन ठेपल्या आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू पंजाबच्या राजकारणामध्ये सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आता त्यांनी ट्विटरवर टाकलेला एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Sidhu) यांनी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्यासोबत एक फोटो टाकला आहे. या फोटोसाठी जे कॅप्शन दिलंय ते मात्र खास चर्चेत आलंय. 'अनेक शक्यतांनी भरपूर असा हा फोटो... चमकता तारा भज्जीसोबत...' असं त्यांनी कॅप्शन दिलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबतचा हा फोटो पाहून हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. हरभजन सिंग (Harbhajan Singh) राजकारणात जाणार का? हा प्रश्न तसा नवीन नाहीये. याआधीही तो भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (Punjab assembly election 2022)

कारण काही दिवसांपूर्वीच, हरभजन सिंग आणि युवराज सिंग या दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या दोन खेळाडूंना आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतेय, असं म्हटलं जात होता. मात्र, भाजपकडून राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या या सगळ्या अफवा असल्याचं ट्विटरवरुन सांगत त्यांने पूर्णविराम दिला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप हरभजन सिंगला अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चेबाबत बोलताना त्याने दुजोरा देत म्हटलं होतं की, ही वेळ राजकारणात योग्य आहे की नाही, याबाबत खात्री नाहीये.

येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय मैदानात उतरणं ही हरभजनसाठी मोठी संधी ठरु शकते. त्याला मैदानात उतरवणं हे देखील सत्ताधारी काँग्रेस पक्षासाठी फायदेशीरच ठरु शकतं. कारण आता काँग्रेसला आपल्याच माजी मुख्यमंत्र्यांसोबतही दोन हात करावे लागणार आहेत. अलिकडेच माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धूंसोबतच्या वादामुळे पक्षाला रामराम ठोकत नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

कदाचित ते निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती करु शकतात. दुसरीकडे हरभजन सिंग सारखा नवा शिख चेहरा पक्षात आल्याने काँग्रेसला नक्कीच उभारी मिळू शकते. हरभजनला 2009 साली पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आलंय. त्याच्या लोकप्रियतेचा पक्षाला फायदा नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे या फोटोनंतर या सगळ्या चर्चांना उधाण आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT