Navjot Singh Sidhu Team eSakal
देश

नवज्योत सिंग सिद्धूंनी मागे घेतला राजीनामा; पंजाबमध्ये नवा ट्विस्ट

पंजाबच्या राजकारणात मागच्या काळात मोठ्या हालचाली घडल्या आहेत.

सुधीर काकडे

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी दिसून आल्या. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी देखील राजीनामा दिला होता. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या मोठ्या वादानंतर अमरिंदर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्दू यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.(Navjot Singh Sidhu withdraws resignation) आपण राजीनामा मागे घेतला असून, लवकरच आपला पदभार स्विकारणार असल्याची माहिती नवज्योत सिंह सिद्धू यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेश अधयक्ष पदाचा राजीनामा मागे घेत असल्याची माहिती स्वत: सिद्धू यांनी दिली. यावेळी ते म्हणाले आपण जे केलं त्यात वैयक्तिक काहीही नाही. आपण राज्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो. राज्यासाठी जे काही करता येईल त्या सर्व गोष्टींसाठी आपण त्यांच्याशी बोलत असतो. चरणजीत चन्नी यांच्याशी माझे कोणतेही मतभेद नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मी जे काही करतो ते पंजाबसाठी करतो, मी पंजाबसाठी उभा आहे, पंजाब माझा आत्मा आहे असंही ते पुढे म्हणाले.

गेल्या साडे चार वर्षात अनेक समस्या मांडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे सत्ता होती पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आपल्याला पदाचा लोभ नाही पण फक्त पंजाबच्या जनतेच्या हक्कासाठीच आपण लढत असून 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसला 80-100 जागा मिळवून देणार असल्याचा विश्वास नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT