navneet rana latest news sakal
देश

नवनीत राणा प्रकरणी दिल्लीत हालचालींना वेग, महाराष्ट्रातील ४ बडे अधिकारी रडारवर

खासदार नवनीत कौर राणा यांच्या तक्रारीची लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने दखल घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार नवनीत कौर राणा यांच्या तक्रारीची लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने दखल घेतली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राज्यात हनुमान चालिसा पठणावरुन राजकारण तापलं होतं. अमरावतीचे राणा दाम्पत्याने 'मातोश्री'वर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, हनुमान चालिसा प्रकरणी बेकायदेशीरपणे अटक करून मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात अयोग्य आणि अमानवी वागणूक देत विशेषाधिकारांचा भंग केल्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने दखल घेतली आहे. (navneet rana latest news)

खासदार राणा यांच्या या तक्रारीमुळे समितीने महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडेय आणि भायखळा महिला जिल्हा कारागृहाचे पोलिस अधीक्षक यशवंत भानुदास फड यांनी साक्षीसाठी १५ जून रोजी पाचारण केले आहे. त्यामुळे सध्या याप्रकरणात हे अधिकारी रडावर असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या वतीने मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीसाठी केंद्र सरकारच्या कार्मिक आणि जनतक्रार आणि पेन्शन मंत्रालयाला, तर रजनीश सेठ, संजय पांडेय आणि भानुदास फड यांच्या उपस्थितीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीपुढे पाचारण करण्यात आलेल्या चारही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीविषयी ७ जूनपर्यंत कळवण्यात यावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची दिल्लीत भेटही घेतली होती. अटकेत असताना अयोग्य वागणूक दिल्याचे राणा यांनी केलेले सर्व आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळून लावले होते. मात्र, राणा यांच्या तक्रारीची दखल घेत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्यातील या चार बड्या अधिकाऱ्यांना १५ जून रोजी संसद भवनातील विशेषाधिकार समितीच्या कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT