Indian Navy seized narcotics Source by ANI
देश

ड्रग्ज माफियांना मोठा दणका; भारतीय नौदलानं पकडला ३,००० कोटींचा अंमली पदार्थांचा साठा

आयएनएस सुवर्णाची अरबी समुद्रात पेट्रोलिंगदरम्यान मोठी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

कोची : अंमलीपदार्थांसंदर्भात भारतीय नौदलानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचं धाब दणाणलं आहे. सोमवारी अरबी समुद्रात पेट्रोलिंगदरम्यान एका मच्छिमार बोटीतून सुरु असलेली तब्बल ३००० कोटी रुपयांची अंमलीपदार्थांची मोठी तस्करी रोखण्यास नौदलला यश आलं. संबंधित बोटीसह यावर काम करणाऱ्या खलाशांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना कोची येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. संबंधित बोट ही भारताची बोट नसल्याची माहिती सुत्रांनी दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. यामुळे ड्रग्ज तस्करीचा मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार उद्ध्वस्त करण्यात आला आहे.

नौदलाच्या निवेदनानुसार, आयएनएस सुवर्णा हे नौदलाचं जहाज अरबी समुद्रात पेट्रोलिंगदरम्यान टेहळणी करत असताना यावरील अधिकाऱ्यांना समुद्रातील एका मच्छिमार बोटीवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर नौदलानं ही बोट थांबवली आणि त्यावर प्रवेश करत शोध मोहिम राबवली. यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांना तब्बल ३०० किलो अंमलीपदार्थ आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणावरील अंमलीपदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल ३,००० कोटी रुपये आहे.

नौदलानं पुढे म्हटलं की, मोठा साठा आणि मोठी किंमत याच्यापेक्षा बेकायदा अंमलीपदार्थांची तस्करीचा मार्ग रोखण्यात आला ही बाब मोठी आहे. हा तस्करीचा मार्ग मक्रान किनाऱ्यावरुन पुढे भारतीय, मालदीव आणि श्रीलंकेच्या हद्दीतून जातो. या कारवाईमुळे मानवी ड्रग्ज अॅडिक्शन, ड्रग्जचा व्यापार उद्ध्वस्त करण्यात यश आलं आहे. यामध्ये दहशतवाद, मूलतत्ववाद आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT