NAWADA Cyber frauds job was to make women pregnant and the payment offered was handsome  
देश

Cyber fraud: मुल होत नसलेल्या महिलेला गर्भवती करा अन् बक्षीस मिळवा; बेरोजगार तरुणांच्या पडल्या उड्या!

सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसत आहेत. बिहारमधील एका टोळीने तर नवाच फंडा शोधून काढला आहे.

कार्तिक पुजारी

नवाडा- सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसत आहेत. बिहारमधील एका टोळीने तर नवाच फंडा शोधून काढला आहे. मुल न होणाऱ्या महिलेला गर्भवती करा आणि १३ लाख रुपये मिळवा असं आमिष दाखवून या भामट्यांनी अनेक तरुणांना फसवलं आहे. या टोळीने यासाठी 'ऑल इंडिया प्रेगनंट जॉब एजेन्सी' नवाडा जिल्ह्यात सुरु केली होती. (NAWADA Cyber frauds job was to make women pregnant and the payment offered was handsome)

बेरोजगार तरुणांना हे आरोपी सांगायचे की, तुम्हाला केवळ एकच काम आहे. मुल होत नसलेल्या महिलेला गरोगर करायचं आणि तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. ऑफर एकदम चांगली होती, त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण यांच्या सापळ्यात अडकले. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, मुख्य सूत्रधार मुन्ना कुमार सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कशा प्रकारे फसवणूक करायचे?

सायबर घोटाळा करणारी टोळी तरुणांना सुरुवातीला नोंदणी शुल्क म्हणून ७९९ रुपये भरायला लावचे. याबदल्यात काम झाल्यास १३ लाख रुपये देण्याचे ते आमिष द्यायचे. डीएसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणांना वॉट्सअॅपवरुन संपर्क साधायचे. त्यांना सांगायचे की, मुल होत नसलेल्या महिलांना गर्भवती करण्याचे काम आहे. त्यानंतर आरोपी तरुणांना अनेक महिलांचे फोटो पाठवायचे.

फोटो तरुणांना पाठवल्यानंतर आरोपी सेक्टुरेटी डिपॉझिट म्हणून आणखी काही रक्कम भरण्यास सांगायचे. ते तरुणांकडे ५ ते २० हजार रुपयांपर्यंतची मागणी करायचे. सुंदर आणि आकर्षक महिलांसाठी जास्त रुपये आकारले जायचे. महिला गर्भवती राहिली तर त्यांना १३ लाख रुपये मिळतील म्हणून सांगितलं जायचं. तसेच महिला गर्भवती राहिली नाही तरी सांत्वन रक्कम म्हणून ५ लाख रुपये दिले जातील असं ते सांगायचे.

आरोपींनी टाकलेल्या या जाळ्यात अनेक तरुण आले होते. त्यांनी काही रक्कम आरोपींना दिली होती. आपली फसवणूक होत असल्याचे काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. पोलिसानी आरोपींकडून ९ मोबाईल फोन, २ प्रिंटर्स आणि काही डाटा शीट जप्त केले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Pawna Dam News : पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर पाटबंधारे विभागाची जोरदार कारवाई!

Pune Municipal Election : मतदारांच्या पळवापळवीने इच्छुकांचे धाबे दणाणले

Ambegaon News : २५०० पशुधनावर एकच दवाखाना; एक्स-रे, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा देणारे ‘तालुका सर्वचिकित्सालय’ रखडले!

SCROLL FOR NEXT