देश

छत्तीसगड : कुख्यात नक्षलवादी चकमकीत ठार, CRPF ची माहिती

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगड : देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त भागांपैकी एक असलेल्या छत्तीसगडमधील सुकमा (sukama) जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश (crpf) आले आहे.

नक्षलवादी कमांडरचा खात्मा

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी (ता.26) संध्याकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान सुरक्षा दलांनी नक्षलवादी कमांडरचा खात्मा केला. मारला गेलेला नक्षलवादी कमांडर बस्ता भीमा सुरक्षा दलांवर झालेल्या किमान नऊ प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामील होता, असे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत माडवी भीमा, मिलिशिया कमांडर असे नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून 1 रायफल, 5 किलो वजनाचा 1 IED, 2 BGL शेल आणि 20 इलेक्ट्रिक डिटोनेटर्स जप्त करण्यात आल्याचे CRPF कडून सांगण्यात आले.

सीआरपीएफ आणि पोलिसांकडून राज्यात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे. यापूर्वीही अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीसांनी सांगितले की, गस्तीदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. चकमक संपल्यानंतर घटनास्थळावरून बस्ता भीमाचा मृतदेह सापडला. मार्च 2020 मध्ये मिनपा हल्ल्यात 17 जवान शहीद झाले होते त्यात भीमाचाही सहभाग होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिंतलनार येथे झालेल्या आयईडी स्फोटातही त्याचा सहभाग असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले, ज्यामध्ये कोब्रा सहायक कमांडंट ठार झाला आणि नऊ जण गंभीर जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Karad : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; अधिराज पाटील जखमी, निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

U19 World Cup: बॅटने इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीने मालिकावीर पुरस्कारानंतर शब्दांनी मनंही जिंकली, जाणून घ्या काय म्हणाला?

Pune News: राज्यातील शासकीय रुग्‍णालयांतील मोफत उपचार बंद; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क, अडीच वर्षांनंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न!

Pakistan Bomb Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या शिया मशिदीत नमाजवेळी आत्मघाती हल्ला; ७० जणांचा मृत्यू, १७० हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT