NCERT removes Babri demolition references in Class 12 political science book 
देश

NCERTकडून 12वीच्या पुस्तकात बदल! बाबरी विध्वंसचा उल्लेख हटविला तर राम मंदिर निर्मिती प्रकरण जोडले

NCERT Class 12 political science book : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) बारावीच्या राजकीय विज्ञान (Political Science) पुस्तकातील काही संदर्भामध्ये बदल केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) बारावीच्या राजकीय विज्ञान (Political Science) पुस्तकातील काही संदर्भामध्ये बदल केले आहेत. बाबरी मशिदीचा विध्वंस हा उल्लेख हटविण्यात आला आहे तर राम मंदिराची निर्मिती हे प्रकरण जोडण्यात आले आहे. पुस्तकातील संवेदनशील संदर्भ बदलण्यात आले असल्याचे एनसीईआरटीचे म्हणणे आहे.

हिंदुत्वाचे राजकारण, गुजरात दंगल आणि अल्पसंख्यांकाशी संबंधित संदर्भही पुस्तकातून वगळण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक वर्षापासून संदर्भ बदलांसह पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सीबीएसई माध्यमाच्या देशभरातील 30 हजार शाळांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके वापरली जातात.

बारावीच्या राजकीय विज्ञानाच्या पुस्तकातील आठव्या धड्यात बाबरी विध्वंसचा उल्लेख आहे. हा उल्लेख हटवण्यात आला असून या जागी राम मंदिर आंदोलनाचा इतिहास, हा उल्लेख करण्यात आला आहे. याच धड्यातील हिंदुत्वाचे राजकारण हा उल्लेख वगळण्यात आला आहे. देशाच्या राजकारणात मागील काही वर्षांत महत्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली असल्याचे 'एनसीईआरटी' कडून या बदलांवर सांगण्यात आले आहे. पुस्तकातील पाचव्या धड्यात गुजरात दंगलीचा तसेच काही ठिकाणी 'मुस्लिम समाज' असा उल्लेख आहे. हा उल्लेखही वगळण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT