1pawar_84.jpg 
देश

प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी माझं पत्र नीट वाचलेलं दिसत नाही, शरद पवारांचा भाजपला टोला

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- पुण्यातील विमानतळासंदर्भात मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. कृषी कायद्यावरुन आमच्यात कोणतीच चर्चा झाली नाही. बुधवारी आम्ही काही पक्ष एकत्र येणार आहोत. आम्ही यासंबंधी राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहोत. सर्वांशी बोलल्यानंतर नव्या कृषी कायद्याबद्दल जी भूमिका ठरेल त्यानंतर बोलू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मोदी सरकार नव्या कृषी कायद्यावरुन विषय भरकटवत असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. 

शरद पवार पुढे म्हणाले की, पुणे विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त असणारे दुसरे विमानतल आहे. पुरंदर येथील विमानतळ अधिग्रहणसंदर्भात मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. कृषी कायद्यासंदर्भात त्यांच्याबरोबर काहीच बोलणे झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आंदोलन आणि नव्या कृषी कायद्यावर बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर 2010 कृषी कायद्यातील सुधारणे संदर्भात पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी माझे पत्र नीट वाचलेले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. सातत्याने शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्याबाबत प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे शरद पवार हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीवर चिडल्याचे दिसले. तुम्हाला इथे बोलावून चूक केली, असेही ते यावेळी म्हणाले. 

हेही वाचा- अदानी-अंबानी कायदे रद्द करा; कृषी कायद्यावरुन काँग्रेसची आक्रमक भूमिका

दरम्यान, आज देशभरात नव्या कृषी कायद्याच्याविरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे टि्वट आपच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन करण्यात आले. केजरीवाल यांनी सोमवारी सिंघू सीमेवर जात आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT