Sharad Pawar statement Traders should take positive stand regarding market yard migration  esakal
देश

NCP Crisis: दिल्लीतल्या बड्या नेत्याची शरद पवारांकडून हाकालपट्टी; 'या' नव्या नेत्याची केली नियुक्ती

राष्ट्रवादीत बंडाळी झाल्यानंतर यामध्ये सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरु केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रवादीत बंडाळी झाल्यानंतर यामध्ये सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरु केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे कायम सचिव तसेच दिल्ली कार्यालयाचे सचिव एस. आर. कोहली यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. खुद्द शरद पवार यांनी ही कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (NCP Crisis Sharad Pawar ousts SR Kohli in Delhi and Sonia Dhuhan oppointed)

पवारांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, माझ्या निदर्शनास आलं आहे की राष्ट्रवादीचे स्थायी सचिव आणि दिल्ली कार्यालयाचे प्रभारी एस.आर. कोहली यांनी 2 जुलै 2023 रोजी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि इतर ८ आमदारांच्या बाजूनं स्पष्टपणे पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाच्या निर्देशाचं आणि आदेशाचं उल्लंघन आणि पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत.

त्यामुळं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेच्या कलम 32चं उल्लंघन करून आणि या घटनेच्या कलम 21(vi)(a) नुसार बनविलेल्या नियमांनुसार स्पष्ट आणि निरपेक्षपणे पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. तुम्ही स्वेच्छेनं सदस्यत्व गमावण्यासारखी कृती केली असून मी अधिकृतरित्या तुमचं नाव पक्षाच्या सदस्यत्व नोंदणीतून काढून टाकत आहे. तुम्ही 9 आमदारांच्या पक्षांतरांची सोय आणि प्रयत्न करत होतात. महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारांनी छुप्या पद्धतीनं मदत करत होतात. त्यामुळं प्राथमिक सदस्यत्वातून तुम्ही अपात्रतेला आमंत्रित केलं आहे.

सोनिया धुहन यांची नियुक्ती

कोहली यांच्या हाकालपट्टीनंतर सोनिया धुहन यांची राष्ट्रवादीच्या दिल्ली मध्यवर्ती कार्यालयाच्या इनचार्जपदी नियुक्ती केली आहे. शरद पवार यांनी स्वतः ही नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी पूर्ण, राज्य महिला आयोगाला पाठवणार अहवाल

SCROLL FOR NEXT