NCP MLA Disqualification Case 
देश

NCP MLA Disqualification: 'राष्ट्रवादी'च्या आमदारांचा फैसला लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत नार्वेकरांना द्यावा लागणार निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल आता लांबणीवर पडला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यामध्ये कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत. यामुळं मात्र शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. (NCP disqualification result postponed Supreme Court gives extension to Rahul Narvekar)

सुप्रीम कोर्टात काय झाल्या घडामोडी

सुप्रीम कोर्टात आज सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावर आक्षेप घेत नार्वेकरांचं अशी चालढकल करणं नेहमीचंच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं त्यांना केवळ एक आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती कोर्टाला केली. (Marathi Tajya Batmya)

नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टाला अशी हमी दिली की ३१ जानेवारीला ही सुनावणी पूर्णपणे बंद होईल आणि निकाल राखून ठेवला जाईल. फक्त त्यांना हा निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ हवा आहे. पण यामध्ये अॅड. सिंघवींनी त्यांना एक आठवड्याचाच वेळ देण्याची मागणी केली. पण सुप्रीम कोर्टात त्यांना १५ दिवसांचा वेळ दिला. त्यानुसार आता जो निकाल ३१ जानेवारीपर्यंत येणं अपेक्षित होत तो आता लांबणवीर पडून १५ फेब्रुवारीला देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

वेळ वाढवून दिल्यानं शिवसेनेसारखाच निकाल येणार?

सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना १५ दिवसांचा वेळ वाढवून दिल्यानं आता शिवसेनेप्रमाणंच राष्ट्रवादीचा निकाल येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निकाल अजून येणं अपेक्षित आहे. (Latest Maharashtra News)

त्यामुळं जर या पंधरा दिवसात निवडणूक आयोगानं निकाल दिला. तर त्याच निकालाच्या आधारे नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रा प्रकरणावर आपला निकाल देतील. कारण शिवसेनेच्याबाबतीतही हे असंच घडलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT