Sharad Pawar esakal
देश

Sharad Pawar : नागालँडमध्ये NCPच्या 7 आमदारांनी विरोध केला होता,पण...; पवारांनी सांगितलं खरं कारण

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांच्यावर टीकास्र सोडलं जात आहे. यासंदर्भात आज त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केलीय. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते.

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच मनसेने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर खोचक टीका केली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील इतर २ पक्षांनीही जागा मिळवल्या आहेत. यामध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयने 2 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवला.

आज नाशिकमध्ये बोलतांना शरद पवार म्हणाले की, आमच्या सात आमदारांना भाजपसोबत जाण्यास विरोधच केलेला होता. मात्र नागालँडमधली परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. नागालँडमध्ये कुठलाच पक्ष बाहेर राहिलेला नाीह. नागालँडमध्ये नागा लोकांचं इश्यू आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेमध्ये ऐक्य म्हत्वाचं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वांना सोबत राहण्याचा विचार केला आहे. त्यामुळे भाजपसोबत आम्ही गेलो, असा त्याचा अर्थ होत नाही; अशी भूमिका पवारांना स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT