sharad pawar 
देश

शरद पवारांनी संसदेत उपस्थित केले दोन महत्त्वाचे प्रश्न

कार्तिक पुजारी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 19 जुलैपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात कोरोना परिस्थिती, पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे, इंधन दरवाढ अशा काही मुद्द्यांवरील चर्चेवर भर दिला जात आहे.

नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 19 जुलैपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात कोरोना परिस्थिती, पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे, इंधन दरवाढ अशा काही मुद्द्यांवरील चर्चेवर भर दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभेतील खासदार शरद पवार यांनी कोरोना काळातील शिक्षणाचा मुद्द्या संसदेसमोर मांडला. महामारीमुळे अनेक मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत त्यांनी केंद्राकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. पवारांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली

कोरोना महामारीचे व्यवस्थापन, लसीकरण मोहीम राबवण्याची पॉलिसी आणि देशातील तिसऱ्या लाटेचे आव्हान या मुद्द्यावरील चर्चेमध्ये शरद पवारांनी राज्यसभेत भाग घेतला. यावेळी त्यांनी दोन प्रश्न संसदेत मांडले. पहिला, देशात दोन कंपन्या कोरोना प्रतिबंधक लशींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत. यात सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांचा समावेश आहे. पण, देशात आणखी दोन कंपन्या आहेत. भारत अॅटिबॉयोटिक्स Hindustan Antibiotics Ltd आणि हापकिन्स Haffkine Institute या कंपन्या लस निर्मित करण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत कराता येईल का? असं पवार म्हणाले.

दुसरा, लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. काही प्रमाणात शहरी भागातील शैक्षणिक सुविधा सुरु आहेत. पण, ग्रामीण भागातील झेडपी शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे माननीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी यासाठी आर्थिक मदत देणे शक्य आहे का? हे सांगावं. जेणेकरुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT