Sonia-Gandhi-Sharad-Pawar
Sonia-Gandhi-Sharad-Pawar 
देश

राष्ट्रपती निवडणूक: राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक पार पडत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना समर्थक दिलेलं आहे. पण या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका आमदारानं आपण भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं आहे. यामुळं या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (NCP MLA Kandhal Jadeja has voted for NDAs presidential candidate Droupadi Murmu)

राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातचे आमदार कंधल एस. जडेजा आणि ओडिशातील काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुकीन यांनी एनडीचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिल्याचं स्वतः सांगितलं आहे. दरम्यान, सध्या एनडीचा भाग नसलेल्या विरोधीपक्षातील शिवसेना, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आदींनी एनडीएच्या मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही दुसऱ्या उमेदवाराला मत दिल्यानं क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांमध्ये सुरुवातीपासूनच बराच खल सुरु होता. पहिल्यांदा सर्वांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी पसंती दिली होती. परंतू या प्रस्तावाला पवारांनी नम्रपणे नकार देत आपल्याला अजूनही सक्रीय राजकारण करायचं असल्यानं आपण उमेदवारी स्विकारु शकत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांकडून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. पण त्यांनीही सध्या जम्मू-काश्मीरला आपली गरज असल्याचं सांगत उमेदवारी स्विकारायला नकार दिला होता. त्यानंतर अखेर पूर्वश्रमीचे भाजपचे खासदार आणि मोदींवर टीका करत पक्षातून बाहेर पडलेले यशवंत सिन्हा यांच्या नवावर विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT