Supriya Sule  sakal media
देश

सुप्रिया सुळे सातव्यांदा 'संसद रत्न'; यंदा महाराष्ट्रातील 4 खासदारांचा होणार गौरव

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशनने 11 खासदारांना 'संसद रत्न अवार्ड 2022'ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. त्या आता सातव्यांदा संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यामध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांचाही समावेश आहे. हा 12 वासंसद रत्न पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे.

याशिवाय भाजपचे तमिळनाडूमधून खासदार असलेले एचवी हांडे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी निवडलं गेलं आहे. विशेष म्हणजे या 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदार आहेत.

कोण आहेत संसद रत्न?

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) यांना या 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के श्रीनिवासन यांनी सांगितलं की, खासदारांच्या कामगिरीच्या आधारेच त्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये PRS इंडियाने प्रदान केलेल्या डेटाचा आधार घेण्यात आला. 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2021 च्या शेवटपर्यंतच्या त्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT