NCP woman leader ties rakhi to BJP MLA who assaulted her in Gujarat
NCP woman leader ties rakhi to BJP MLA who assaulted her in Gujarat 
देश

भाजप आमदाराचा मार खाल्ल्यानंतरही बांधली राखी

वृत्तसंस्था

अहमदाबादः भारतीय जनता पक्षाचे आमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी यांना भररस्त्यात बेदम मारहाण केली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर नीतू तेजवानी यांनी थवानी यांना राखी बांधली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी या पाण्याची तक्रार घेऊन थवानी यांच्याकडे गेल्या होत्या. यावेळी थवानी यांनी त्यांना मारहाण केली होती. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर थवानी यांनी नीतू तेजवानी यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. थवानी यांनी रुग्णालयात जाऊन नीतू यांची भेट घेतली. यावेळी, नीतू यांच्याकडून राखीही बांधून घेतली. नीतू यांनीही झाले गेले विसरून बलराम यांना राखी बांधली आहे. थवानी म्हणाले, 'नीतू मला बहिणीसारखी आहे, झाल्या प्रकाराबद्दल मी तीची माफी मागतो. आमच्या दोघांमध्ये गैरसमजूतीचा प्रकार घडला होता. यापुढे तिला कोणतीही मदत लागल्यास मी सदैव तिच्या पाठिशी उभा असेल.'

दरम्यान, नीतू तेजवानी (कुबेर नगर वॉर्ड) या आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी स्थानिक प्रश्नांवरून जाब विचारल्याने आमदार थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर काढत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. थवानी यांनी स्थानिक समस्या ऐकून न घेताच माझ्या कानशिलात मारले. जेव्हा मी खाली पडले तेव्हा त्यांनी लाथांनी मारायला सुरुवात केली. यानंतर माझ्या नवऱ्यालाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारायला सुरुवात केली. मोदींनी त्यांच्याच राज्यात महिला सुरक्षित आहेत का? याचे उत्तर द्यावे, असा आरोप नीतू तेजवानी यांनी केला होता. आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तेजवानी यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, बलराम यांनी राखी बांधून घेतल्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT