सर्वोच्च न्ययालय sakal
देश

देशात हुंडाविरोधी कायदा मजबूत करण्याची गरज : सर्वोच्च न्यायालय

कुटुंबात येणाऱ्या स्त्रीला आपण कसे वागवतो, हा मुद्दा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हुंडाबळीच्या (Anti-dowry) प्रकरणांवर चिंता व्यक्त करताना देशात हुंडाविरोधी कायद्यांचा पुनर्विचार करण्याची, तसेच हुंडाविरोधी कायदा अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे.

भारतीय विधि आयोग (Law Commission of India) हुंड्यामुळे होणारे मृत्यू आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यांवर विचार करू शकतो, तसेच विद्यमान कायदे आणखी मजबूत करण्यासाठी उपाय सुचवू शकतो, असेदीखील न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात आरटीआय अधिकार्‍याच्या बरोबरीने हुंडाविरोधी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, त्यावेळी न्यायालयाने वरील मत व्यक्त केले आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर होते. त्यावर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देशात हुंडाविरोधी कायदा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड म्हणाले की, "कायदे महत्त्वाचे आहेत, पण बदल आतूनच व्हायला हवा. कुटुंबात येणाऱ्या स्त्रीला आपण कसे वागवतो, हा मुद्दा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.याचिकाकर्त्याच्या सुनावणीदरम्यान व्हीके बिजू म्हणाले, "केरळमधील परिस्थितीमुळे मी व्यथित झालो आहे. एका आयुर्वेदिक डॉक्टरवरील हुंडा अत्याचार प्रकरणावर कारवाई न केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

केरळमध्ये सोने आणि इतर गोष्टींची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते, ही अतिशय वाईट प्रथा असल्याचे सांगत याबाबत नोटीस पाठवून चौकशी आयोगाची स्थापना करण्यात यावी, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT