NEET Exam Esakal
देश

NEET 2024 : नीट परीक्षेसंदर्भातील 38 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या एकत्रित सुनावणी

‘नीट’ परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या संदर्भात दाखल असलेल्या ३८ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. ७ ः ‘नीट’ परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या संदर्भात दाखल असलेल्या ३८ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. पाच मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत अनियमितता झाल्याचा आक्षेप असंख्य विद्यार्थ्यांबरोबरच विरोधी पक्षांनी घेतला होता. ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची विनंती काही याचिकांमध्ये करण्यात आली आहे. तर  विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द केली जाऊ नये, असेही काही याचिकांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही शुक्रवारी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, ‘‘संपूर्ण नीट परीक्षा रद्द करणे तर्कसंगत ठरणार नाही,’’ असे म्हणणे मांडले आहे. 

‘नीट’ परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देखील न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत आपले म्हणणे मांडले आहे. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’ तसेच आयुष अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश हे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट) माध्यमातून दिले जातात. नीट परीक्षेतील अनियमितता चव्हाट्यावर आल्यानंतर सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयने विविध राज्यांत कारवाई करत काही आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT