NEET UG 2022 Sakal
देश

NEET UG 2022 : परीक्षा पुढे ढकण्यास दिल्ली HC चा नकार; 17 जुलैलाच होणार परीक्षा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : NEET UG 2022 परीक्ष पुढे ढकलण्यात यावी यासंदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटालून लावली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजेच 17 जुलै रोजी पार पडणार आहे. यासाठी 12 जुलै रोजी परीक्षेची (EXam) प्रवेशपत्रे जारी करण्यात आली आहेत. त्यानंतरही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यावर न्यायालयाने याचिकेत योग्यता नसल्याचे कारण देत ही याचिका फेटालून लावली आहे. (Neet UG 2022 Exam News In Marathi)

ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी सोशल मीडियावर #PostponeNEET2022 या हॅशटॅगसह मोहीमही चालवली जात होती. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देताना परीक्षेची तारीख वाढवण्यास नकार दिला आहे. NEET परीक्षा पुढे ढकलण्याव्यतिरिक्त, दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत NEET UG 2022 परीक्षेत अतिरिक्त संधी देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मागणीवरही पाणी फेरले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT