NEET Exam Sakal
देश

NEET-UG ची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारीपासून; असं असेल वेळापत्रक

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : NEET-UG च्या प्रवेश प्रक्रियेला येत्या १९ जानेवारीपासून सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी याचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. ट्वीट करुन आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. (NEET UG counseling begin from January 19 Shcedule released)

मांडवीय यांनी म्हटलं की, "प्रिय विद्यार्थ्यांनो, NEET UG च्या प्रवेश प्रक्रियेला १९ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. तुम्ही सर्वजण देशाचे भविष्य आहात. आम्हाला आशा आहे की, आपण सर्वजण सेवा ही धर्म या मंत्रासह आपलं करियर पुढे न्याल. मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो"

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी आरोग्य मंत्र्यांनी NEET PG प्रवेशाची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार, १२ जानेवारी २०२२ म्हणजेच कालपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. निवासी डॉक्टरांना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर MCC द्वारे ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan ला टीम इंडियातून वगळल्याने वाद; शमा मोहम्मद यांचे गौतम गंभीरवर मोठे आरोप, म्हणाल्या- तो खान म्हणून...

Kolhapur News: रस्त्याच्या मध्यभागी जनावराचं काळीज पांढऱ्या कपड्यात ठेवलं अन्...; कोल्हापुरात अघोरी प्रकार समोर, काय घडलं?

'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची मोठी झेप; साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

Kagiso Rabada ने मोडला फलंदाजीतील ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम, शाहीन आफ्रिदीला भारताच्या अभिषेक शर्मासारखे झोडले Video Viral

Latest Marathi News Live Update : नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT