up esakal
देश

UP Crime: शेजाऱ्याच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या रागातून मुस्लिम मुलाच्या आई-वडिलांची हत्या

सकाळ डिजिटल टीम

Neighbours Beat UP sitapur Muslim Couple To Death

सितापूर- उत्तर प्रदेशातील सितापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेजाऱ्यांनी पती आणि पत्नीला लोखंडी रॉड आणि काठीने मारुन त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित दांम्पत्याच्या मुलाचे आरोपीच्या मुलीशी प्रेमप्रकरण होते.

जोडपे अब्बास आणि पत्नी कमरुन निशा यांचा मारहाणीत जागीत मृत्यू झालाय. शुक्रवारची ही घटना असून हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. सीतापूरचे पोलिस अधिक्षक चक्रेश मिश्रा यांनी माहिती दिली की, काही वर्षांपूर्वी अब्बास यांच्या मुलाचा शेजारच्या मुलीची प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तो मुलीसोबत पळून गेला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली होती आणि नंतर अब्बास यांच्या मुलाला तुरुंगवास झाला होता.

काही दिवसांपूर्वी अब्बास यांच्या मुलाची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर शेजाऱ्यांनी बदला घेण्याची योजना बनवली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे नाव शौकत असून त्याचे शेजाऱ्याच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. २०२० मध्ये शौकत मुलीला घेऊन पळून गेला होता. मुलगी अल्पवयीन होती. पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर शौकत तुरुंगात गेला.

शौकत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा मुलीला घेऊन पळाला होता. त्यानंतर जूनमध्ये त्याने तिच्याशी लग्न केले होते. याच गोष्टीचा राग मनात ठेवून रामपाल याच्या कुटुंबियांनी बदला घेण्याची तयारी केली. यातून पाच जणांनी अब्बास यांच्या घरावर हल्ला करुन अब्बास आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलंय. दोघांचा शोध सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT