भारती पवार सकाळ
देश

Onion Import : नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही, नाफेडमार्फत विक्रीही नाही- भारती पवार

नाफेडमार्फत महाराष्ट्रात कांदा विक्री केला जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दत्ता लवांडे

Mumbai News : नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कांदा विक्री केला जाणार नाही त्याचबरोबर नेपाळमधून आयात केलेला कांदा महाराष्ट्रात येणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा विक्री करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यामुळे राजकारण तापलं होतं.

"नेपाळमधून जो कांदा आयात होणार आहे तो कांदा इथे विक्री केला जाणार आणि इथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा बाजार पडणार अशा चर्चा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. या चर्चा चुकीच्या आहेत. नाफेड कांदा इथे खरेदी करेल पण इथे विक्री करणार नाही. नाफेडकडून हा कांद्याचा स्टॉक इतर राज्यांना देण्यात येणार आहे. ज्या राज्यांना गरज असेल त्या राज्यांना हा कांदा निर्यात केला जाणार आहे."

"केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं असून ज्या राज्यांना गरज आहे ते राज्य फक्त आणि फक्त नेपाळमधून कांदा आयात करू शकतात अशी परवानगी दिली आहे, पण ते बंधनकारक नाहीये, ते शेजारच्या राज्याकडूनही कांदा घेऊ शकतात. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात चुकीच्या चर्चा केल्या जात असून महाराष्ट्रातील कांद्याचा भाव पडणार असं बोललं जातंय पण हे सर्व चुकीचं आहे" असं मत भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे.

काय होत्या चर्चा?

नेपाळमधून कांदा आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिल्यानंतर आता इथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळणार नाही अशा चर्चा सुरू होत्या. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरून सरकारवर निशाणा साधला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT