Corona Update Sakal
देश

Corona Update : गेल्या 24 तासांमध्ये 322 नव्या रुग्णांची नोंद, केरळमध्ये एकाचा बळी; देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,742 वर

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये शनिवारी 128 नव्या रुग्णांची नोंद झाली. याच दिवशी कर्नाटकात 96, महाराष्ट्रात 35 तर दिल्लीमध्ये 16 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

Sudesh

Daily Covid Update : गेल्या 24 तासांमध्ये देशात 322 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,742 झाली आहे. यासोबतच काल दिवसभरात केरळमध्ये आणखी एका कोविड बळीची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये शनिवारी 128 नव्या रुग्णांची नोंद झाली. याच दिवशी कर्नाटकात 96, महाराष्ट्रात 35 तर दिल्लीमध्ये 16 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी एका दिवसात देशात 400 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेने शनिवारी समोर आलेली रुग्णसंख्या कमी असल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

नव्या व्हेरियंटने वाढवली चिंता

कोरोनाच्या जेएन.1 नव्या व्हेरियंटमुळे देशाचं टेन्शन वाढलं आहे. या व्हेरियंटची लागण झालेल्यांना घशात खवखव होणे हे वेगळं लक्षण दिसून येत आहे. गंभीर लागण झाल्यास किंवा उपचार न घेतल्यास चक्क आवाजही जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येतो आहे.

केंद्र सरकारने या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. न्यू इयर आणि ख्रिसमस साजरी करताना कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केलं जात आहे.

आरोग्य संघटनेचा दिलासा

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वेगळा असला, तरी तो जास्त घातक किंवा धोकादायक असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे जुन्याच लसींचा वापर करून याला आळा घालणं शक्य असल्याचं WHO ने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT