New Criminal Laws  sakal
देश

New Criminal Laws : नव्या संहितेनुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद;तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात

देशभरात सोमवारपासून तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून भारतीय न्याय संहितेनुसार देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद राजधानी दिल्लीत झाल्याची आज दिवसभर चर्चा होती, मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिला गुन्हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नोंदल्याची माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशभरात सोमवारपासून तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून भारतीय न्याय संहितेनुसार देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद राजधानी दिल्लीत झाल्याची आज दिवसभर चर्चा होती, मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिला गुन्हा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नोंदल्याची माहिती दिली.

भारतीय न्याय संहितेर्तंगत देशातील पहिला गुन्हा ग्वाल्हेर येथे दाखल करण्यात आला. हजिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ते प्रकरण वाहनचोरीचे असल्याची माहिती आज गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

नव्या संहितेनुसार मध्यरात्री १२.२४ मिनिटांनी हजिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची माहिती स्वत: गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. हा गुन्हा ३०३ (२) नुसार दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचे प्रकरण आहे. यापूर्वी हे कलम ३७९ नावाने ओळखले जात होते.

शहा म्हणाले, ग्वाल्हेर येथे रात्री १२.१० वाजता गुन्हा दाखल झाला. दिल्लीच्या प्रकरणाबाबत बोलायचे झाल्यास तेथील फेरीवाल्याविरुद्धचा खटला विचाराधीन आहे. पोलिसांनी नव्या संहितेनुसार प्रकरणाची पडताळणी केली असता ते प्रकरण फेटाळून लावले. गुन्ह्याची तारीख एक जुलैच्या अगोदर असेल तर त्यावर जुन्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल आणि नंतरची घटना असेल तर त्यावर नव्या संहितेनुसार खटला चालविला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT