Finance Minister Nirmala Sitharaman ANI
देश

लवकरच क्रिप्टो विधेयक आणणार; सीतारमण यांची राज्यसभेत माहिती

क्रिप्टोकरन्सीच्या (crypto currency) जाहिरातींवर बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीच्या (crypto currency) जाहिरातींवर बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच "हे एक 'जोखमी' असलेले क्षेत्र असून ते पूर्ण नियामक चौकटीत नाहीये. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि बाजार नियामक (SEBI) मार्फत जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी आज राज्यसभेत दिली. याशिवाय सरकार याबाबत लवकरच विधेयक आणणार असल्याचे त्या म्हणाल्या.

नवीन विधेयकावर (New Bill) काम केले जात असून ते लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल," असे त्यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या वेळी क्रिप्टोकरन्सीवर एक विधेयक प्रस्तावित करण्यात आले होते, परंतु आता आम्ही नवीन विधेयकावर काम सुरू केले असून मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर ते सभागृहात सादर केले जाईल असे त्या म्हणाल्या.

जाहिरातींवर अंकुश ठेवण्यासाठी उचललेल्या उपाययोजनाबद्दल विचारण्यात आलेल्या खासदार सुशील कुमार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, "क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत, परंतु गुंतवणूकदारांना सावध केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT