Ravi Shankar Prasad sakal
देश

New Delhi : ‘आप’च स्वत:ला संपवित आहेत : प्रसाद

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचा केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि भाजप आमनेसामने आले आहेत. केजरीवाल यांच्या संमतीशिवाय हा गैरव्यवहार होऊच शकत नाही, असे सांगत ‘आप’च स्वत:ला संपवित आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दोन्ही नेते तुरुंगात आहेत. तर ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ‘‘केंद्र सरकार आम्हाला संपवू पाहत आहे,’’ असा आरोप आप नेत्यांनी केला आहे.

याबाबत बोलताना प्रसाद म्हणाले, ‘‘तुम्ही भ्रष्टाचार करणार, चुका करणार आणि चौकशी झाली तरी तुम्हाला त्रास होणार. उत्पादन शुल्क धोरण का बदलले गेले? मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या याबाबत काही नोंदी आहेत का? कराचे प्रमाण १२ टक्क्यापर्यंत का वाढवले गेले? धोरण जर चांगले होते तर ते दहा महिन्यात का बदलले गेले? दलालीला प्रोत्साहन देणारे धोरण बनवल्याबद्दल केंद्र सरकार काय म्हणाले होते? या प्रश्नांची उत्तरे ‘आप’ने द्यावीत.’’

केजरीवाल यांना अटक होण्याची ''आप'' ला भीती

उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी दोन नोव्हेंबर रोजी चौकशीनंतर केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, अशी भीती आप नेत्या आतिशी यांनी व्यक्त केली आहे. ‘‘आमच्या पक्षाला लक्ष्य करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केंद्र सरकार करीत आहे. केजरीवाल यांना अटक झाली तर ती गैरव्यवहारासाठी नसेल तर भाजपविरोधात बोलल्याबद्दल असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केजरीवााल यांची भीती वाटत असल्यानेच ते ''आप'' ला संपवू पाहत आहेत,’’ असा आरोप आतिशी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT