fireworks 
देश

फटाकेबंदीच्या निर्णयावरून नाराजीचे सूर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राजस्थान, दिल्लीसह अन्य राज्यातील फटाकेबंदीची झळ फटाकेनिर्मिती उद्योगाला बसल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकने कांग्रेसशासीत राजस्थानातील फटाकेबंदीच्या निर्णयावर निराधार आणि अशास्त्रीय बंदी अशा शब्दात आक्षेप घेतला असून ८ लाख जणांच्या रोजगाराला याचा फटका बसणार असल्याची नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत स्वदेशी जागरण मंचानेही या फटाकेबंदी विरोधात पुढे सरसावताना अपुऱ्या माहितीच्या आधारे सरसकट बंदी नको, अशी भूमिका घेतली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली, राजस्थानसह अन्य राज्यांमध्येही फटाकेबंदीचा विचार सुरू असल्याने शिवकाशी (तमिळनाडू) येथे चिंता वाढली आहे. या राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकचे लोकसभेतील गटनेते टी. आर. बालू यांनी आज श्रममंत्री संतोष गंगवार यांना पत्र लिहून या बंदीविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच श्रममंत्र्यांनी व्यक्तिगत पातळीवर हस्तक्षेप करून बंदी हटवावी आणि फटाके उद्योगातील कामगारांसाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टी. आर. बालू यांनी पत्रात म्हटले आहे, की केाही राज्यात फटाके बंदीचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. ही एकतर्फी बंदी फटाकेनिर्मिती उद्योगावर आणि रोजगारावर गंभीर परिणाम करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणासह सर्व मुद्द्यांवर सांगोपांग विचार करून दिवाळीच्या दिवशी २ तास फटाके उडविण्याला परवानगी दिली आहे. याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयाचा फटाके उडविण्याला होकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार या फटाक्यांमध्ये बंदी घातलेली घातक रसायनेही नाहीत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फेरविचाराचे आवाहन 
दरम्यान, संघ प्रणीत स्वदेशी जागरण मंचानेही राज्यांना बंदीच्या फेरविचाराचे आवाहन केले आहे. मंचाचे समन्वयक अश्विनी महाजन यांनी यासंदर्भात म्हटले आहे, की फटाक्यांमुळे होणाऱ्या कथित दुष्परिणामाच्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून राज्यांनी बंदी घालण्याचे टाळावे. कोणताही ठोस आधार नसताना राज्य सरकारांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदीचा निर्णय पूर्णपणे अनुचित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT