मीडियापार्ट sakal
देश

‘डसॉल्ट’ने दलालीसाठी तयार केली बनावट बिले

राफेल गैरव्यवहारप्रकरणी ‘मीडियापार्ट’ चा दावा

अक्षय साबळे

नवी दिल्ली : ‘राफेल’ या लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणी मीडियापार्ट या फ्रेंच नियतकालिकाने आज आणखी काही खळबळजनक दावे केल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या व्यवहारामध्ये मध्यस्थाला ७.५ दशलक्ष युरोंची दलाली देण्यासाठी डसॉल्ट एव्हिएशनने काही बोगस बिले तयार केली होती, असा दावा या नियतकालिकाडून करण्यात आला आहे.

यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यातील ३६ राफेल विमानांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार मार्गी लागल्याचे बोलले जाते. या व्यवहारात दलाली देण्यात आल्याचे पुरावे उपलब्ध असताना देखील भारतीय तपास संस्थांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असेही ताज्या वृत्तांत म्हटले आहे. संरक्षण मंत्रालय अथवा ‘डसॉल्ट’कडून मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

‘‘ या सगळ्या व्यवहारामध्ये मोठी हेराफेरी करण्यासाठी परदेशस्थ कंपन्या, बनावट कंत्राटे आणि चुकीच्या बिलांचा वापर करण्यात आला. भारतातील केंद्रीय पोलिस पथके, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आर्थिक हेराफेरीचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयासारख्या (ईडी) सहकारी तपास संस्थांकडे या दलालीबाबत ऑक्टोबर- २०१८ पासून पुरावे होते पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

डसॉल्ट कंपनीने मध्यस्थ सुशेन गुप्ता याला ७.५ दशलक्ष युरोंची (६५० दशलक्ष रुपये) गोपनीय दलाली दिली होती.’’ असे मीडियापार्टने ताज्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान याच नियतकालिकाने याआधीच या व्यवहारामध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता पण केंद्र सरकार आणि कंपनीने मात्र ते फेटाळून लावले होते. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही २०१९ मध्ये या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT