अरविंद केजरीवाल sakal
देश

New Delhi : सत्तेत आलो तर मोफत उपचार

पंजाबी जनतेला अरविंद केजरीवालांचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

लुधियाना (पीटीआय): पंजाबमधील राजकीय रणसंग्रामात आता आम आदमी पक्षाने (आप) उडी घेतली असून पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज आरोग्य हमीचे आश्‍वासन देताना सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार आणि औषधे उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केली आहे.

राज्यात आमचा पक्ष सत्तेवर आला तर आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येतील असे त्यांनी जाहीर केले आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत, चांगले उपचार दिले जातील. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जातील तसेच आरोग्य चाचण्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर येथे सोळा हजार छोटी रुग्णालये सुरू करण्यात येतील. राज्यात सध्या जी रुग्णालये आहेत त्यांच्या स्थितीमध्येही सुधारणा केली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

रुग्णांची लुबाडणूक थांबवण्याचे प्रयत्न

  1. अपघातातील जखमींवर मोफत उपचार

  2. सरकारी रुग्णालयांत सुविधा नसल्याने लोक खासगी रुग्णालयांमध्ये जातात

  3. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुबाडणूक

  4. सरकारी रुग्णालयांत सर्वच गोष्टींची वाणवा

  5. रुग्णालयांच्या यंत्रणांचे संगणकीकरण होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : दिवाळीसाठी फटाके आणायला गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत; ट्रकच्या धडकेत बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू...

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

SCROLL FOR NEXT