rahul gandhi 
देश

राहुल गांधी हेच आमचे "स्टार प्रचारक'

सकाळन्यूजनेटवर्क

भाजपचा टोला; निवडणुकांची चिंता कॉंग्रेसला

नवी दिल्ली: "गुजरातसह इतर राज्यांच्या निवडणुकांची चिंता भाजपला नसून ती कॉंग्रेसला आहे. त्यांच्या भावी अध्यक्षांच्या अमेरिका दौऱ्यात हीच चिंता प्रकट होत असली, तरी नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यानंतर राहुल गांधी हेच भाजपसाठी "स्टार प्रचारक' आहेत व असतील,' असा टोला भाजपने लगावला आहे. राहुल गांधी हे सध्या परदेशांत फिरून स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत असून, यात भाजपला काहीही अडचण नाही, अशीही सत्तारूढ पक्षाची भूमिका आहे.

जगात 189 देश असून राहुल गांधी हे मोदी सरकारवर भाष्य करू लागल्यापासून फक्त दोनच देश फिरले आहेत, असा चिमटा काढून भाजपचे नेते राम माधव म्हणाले, की अद्याप ऑक्‍सफर्ड, हार्वर्डसह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांचे ज्ञान ऐकायला मिळेल, अशी आशा आम्ही करू शकतो. मात्र, देशात विधानसभा निवडणुकीचे रणांगण तापत जात असताना राहुल गांधी परदेशांत जात आहेत, हेही लक्षणीय ठरावे.

भाजपच्याच एका "थिंक टॅंक' नेत्याने राहुल गांधी यांचे वर्णन "भाजपचे स्टार प्रचारक' असे केले. राहुल गांधी हे मोदींवर जेवढी टीका करतील तेवढा 2019 मधील मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विजय आलेख वाढेल, असे भाकीतही त्यांनी केले. मोदी सरकारने नोटाबंदीसारखे निर्णय घेतले. त्याचे काही तात्कालिक तोटे असतीलही; पण दूरगामी फायदे सध्याच्या त्रासाहून जास्त मोठे असतील व 2019 पर्यंत ते निश्‍चित दिसतील, असाही विश्‍वास या नेत्याने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT