Plane journey
Plane journey Sakal
देश

Delhi News : विमानात महिलेवर लघुशंका करणारा मद्यधुंद दिल्ली भागातच दडून बसला?

मंगेश वैशंपायन

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी आज सांगितले.

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी आज सांगितले. हा गुन्हा दिल्ली पोलिसांनी हातात घेतल्यामुळे हा किळसवाणा प्रकार करूनही गेले तीन महिने मोकाट असलेला हा मुंबईचा रहिवासी दिल्ली व परिसरातच दडून बसल्याचे मानले जाते.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की आरोपी हा मुंबईचा रहिवासी असला तरी त्याचे सध्याचे ठिकाण दुसऱ्या राज्यातील असून पोलिस तेथे पोहोचले आहेत. आम्ही लवकरच आरोपीला अटक करू." महिलेवर लघवी करणाऱ्या प्रवाशाला पकडण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. मुंबईशिवाय इतर काही ठिकाणी छापे टाकले.

नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या बिझनेस क्लासच्या फ्लाइटमध्ये या ज्येष्ठ नागरिक महिलेवर लघुशंका करणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला पकडण्यासाठी पोलीस पथके गेली त्यांच्या सांगण्यानुसार आरोपी मुंबईत नाही. दिल्ली पोलिसांनी त्याल फरारी जाहीर केले आहे. एअर इंडियाने यावर कारवाईच केली नव्हती. एअर इंडियाने आरोपींवर ३० दिवसांची बंदी घातली आहे व याशिवाय ते कठोर कारवाई करू शकत नाहीत अशी सारवासारव करण्यात आली आहे.

एअर इंडियाने या प्रवाशाला त्यानंतर कारवाई न करता घरी जाऊ दिले होते. पण या महिलेने कंपनीच्या अध्यक्षांनाच पत्र लिहील्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली व एअर इंडियाला कारवाई सुरू करणे भाग पडले. त्यानंतर सरकारच्या ‘वरिष्ठ' पातळीवरून कारवाईचे निर्देश मिळाल्यावर विमान वाहतूक मंत्रालयालाही जाग आली .याशिवाय महिला आयोगाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडून सात दिवसांत सविस्तर अहवाल मागवला आहे.

दिल्ली पोलिसांनी कलम ३५४, ५०९ आणि ५१० अंतर्गत तसेच भारतीय विमान कायद्याच्या कलम २३ नुसार या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही दिल्लीबाहेरचे रहिवासी आहेत. नोव्हेंबरमधील या घटनेवर एअर इंडियाने म्हटले आहे की या प्रकरणी एअर इंडियाने (जानेवारीत) एक अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे आणि या मोकाट प्रवाशाला 'नो-फ्लाय लिस्ट' यादीत टाकण्याची शिफारस केली आहे. हे प्रकरण सरकारी समितीच्या अंतर्गत आहे आणि निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT