देश

व्हॉट्सॲपचे एकतर्फी बदल अमान्य; केंद्राचे कंपनीला खरमरीत पत्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - व्हॉट्‌सॲप या मेसेजिंग ॲपने व्यक्तीगतता धोरणाची (प्रायव्हसी पॉलिसी) अंमलबजावणी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली असली तरीसुद्धा भारत सरकारने त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. व्हॉट्सॲपकडून केले जाणारे एकतर्फी बदल योग्य नसून ते स्वीकारार्ह देखील नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना या संदर्भात एक पत्र लिहिले असून त्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲपचा भारतातील यूजरबेस हा सर्वांत मोठा असून  या सेवेसाठीचे हे जगातील सर्वांत मोठे मार्केट देखील आहे. नव्या प्रायव्हसी धोरणामुळे सगळ्यांच्याच चिंता वाढल्या आहेत. यामुळे यूजर्संचे पर्याय आणि त्यांच्या स्वायत्ततेवर देखील मर्यादा येणार आहेत. व्हॉट्सॲपने हे प्रस्तावित धोरण मागे घ्यावे. माहितीची गोपनीयता, पर्यायांचे स्वातंत्र्य आणि भारतीय नागरिकांची स्वायत्ता याबाबत कंपनीने आपल्या धोरणामध्ये बदल करावेत, कंपनीकडून भारतीयांचा योग्य मान ठेवला जावा असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान व्हॉट्सॲपच्या या नव्या धोरणावर अनेक नेटीझन्सनी चिंता व्यक्त करताना यामुळे आमचा खासगीपणा धोक्यात येईल अशी चिंता व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT