लस sakal
देश

नवी दिल्ली : ‘झायकोव्ह-डी’ लस खरेदीचे आदेश

केंद्र सरकार एक कोटी मात्रा घेणार, लवकरच राष्ट्रीय लसीकरणात समावेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : झायडस कॅडिला कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ या लसीचा लवकरच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या लसीच्या एक कोटी मात्रांच्या खरेदी आदेश दिले आहेत. १२वर्षांपुढील सर्वांना ही लस देता येणार आहे. सुरुवातीला प्रौढांना ही लस देण्यात येणार आहे, नंतर मुलांना दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

‘झायकोव्ह-डी’ या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेशास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिल्याचे समजते. यासाठी आवश्‍यक ती पूर्वतयारी करण्यासही मंत्रालयाने सांगितले आहे. ही लस ३५८ रुपयांना (करांव्यतरिक्त) उपलब्ध होणार आहे. या किमतीमध्ये ९३ रुपये किमतीच्या ‘जेट ॲप्लिकेटर’चाही समावेश आहे. या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक डोस २८ दिवसांच्या मुदतीने घ्यायचा आहे. ही डीएनए आधारित व सुई विरहित लस आहे.

‘झायकोव्ह-डी’ या लसीला २० ऑगस्ट रोजी औषध नियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ३० सप्टेंबर रोजी सांगितले होते. दर महिन्याला एक कोटी लसींचे डोस देण्याची क्षमता झायडस कॅडिला कंपनीची आहे.

आणखी एक लस

भारत बायोटेकनेही दोन ते १८ या वयोगटातील मुलांसाठी लस तयार केली असून भारताचे औषध नियंत्रकांमार्फत त्याची तपासणी सुरू आहे. ती लसही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीच्या वापराला काही अटींवर परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने १२ ऑक्टोबर रोजी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT