health 
देश

हिवाळ्यात साथरोगांपासून सांभाळा; मंत्रालयाकडून राज्यांसाठी नव्या सूचना

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सणासुदीचे दिवस आणि हिवाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबरोबरच अन्य आजार बळावण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. आरोग्यविषयक नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लोकांनी तयार राहावे, असे सरकारकडून सूचित करण्यात आले होते. कोरोनानिर्मूलनाबाबत राज्यांनी केंद्रीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क वाढवावा, अशा सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत. 

दसरा-दिवाळी या सणांच्या काळामध्ये कोरोना कंटेन्मेंट झोनच्या बाहेर लोकांना ठरावीक संख्येने एकत्र येण्यास आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली होती. पण, लॉकडाउनचे निर्बंध पूर्वीप्रमाणेच कठोर ठेवावेत, त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येऊ नये, असेही आता राज्यांना सांगण्यात आले आहे. हिवाळ्यातील आजारांमुळे कोरोनाच्या चाचण्यांमध्ये येऊ शकणारे अडथळे टाळावेत, असे आरोग्य मंत्रालयाचे सांगणे आहे.

या दोन्ही आव्हानांना  रोखण्यासाठी राज्यांच्या आरोग्य यंत्रणांचा अंतर्गत समन्वय, सातत्याने देखरेख-देखभाल, तंत्रज्ञान, विविध ॲप व अन्य मदतीने लोकांची गर्दी न जमू देणे वा सामूहिक प्रसाराच्या शक्‍यता रोखणे, यासारखे उपाय आखण्यात यावेत, असेही सांगण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लसीकरणाच्या मोहिमा राबवा
सणासुदीच्या काळात याबाबत समन्वित प्रयत्न वाढविण्याची दक्षता घ्यावी. राज्यांनी हिवाळी आजारांबाबतचे लसीकरण व औषधांच्या फवारणीसारखे उपाय व्यापकस्तरावर अमलात आणावेत. कोरोनामुळे जाणारे जीव वाचविण्यासाठी आणखी व्यापक प्रमाणावर लसीकरणाच्या मोहिमा राज्यांनी राबवाव्यात, असे सांगण्यात आले आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साथरोगांवर बारीक नजर हवी
नव्या आरोग्य दिशानिर्देशांत म्हटले आहे की, ‘‘हिवाळ्यात मलेरिया, चिकनगुनिया, डेंगी यांसारखे साथरोगही पसरतात. देशात कोरोना महामारीची तीव्रता अद्याप कमी झालेली नसल्यामुळे या रोगांची घातकता यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा जास्त जाणवू शकते. त्यामुळे या साथरोगांची लागण झालेल्यांपैकी किती जण कोरोनानेही संक्रमित आहेत, याची बारकाईने तपासणी सातत्याने करावी. साथरोग आणि कोरोना यात वैद्यकीय तज्ज्ञांचीही गल्लत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वेगाने वाढवावी व को-इन्फेक्‍शन वेळीच ओळखावे. राज्यांनी केलेल्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह-निगेटिव्ह येणे आणि त्यातील चुकांचे प्रमाणही काळजी करण्यासारखे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Stock Market Closing: दिवाळीनिमित्त बाजारात उत्साह; निफ्टी 25,843 वर बंद; उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग

Cricketer Retirement: भारताच्या ३६ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय; दोनदा जिंकला होता BCCI चा पुरस्कार

Diwali festival : भारतात एक राज्य असंही जिथं आजही बहुतांश लोक दिवाळीच करत नाहीत साजरी, कारण...

Bhavish Aggarwal: ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT