New Labor Code News New Labor Code News
देश

New Labor Code : नव्या कामगार कायद्यात तीन दिवसांची सुट्टी? मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण

चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

सकाळ डिजिटल टीम

New Labor Code News नवी दिल्ली : नवीन कामगार संहितेबाबत (New Labor Code) बऱ्याच दिवसांपासून अनेक बातम्या येत आहेत. ज्यामध्ये आठवड्यातून चार कामकाजाच्या दिवसांनंतर तीन दिवसांच्या सुट्टीच्या चर्चेचा समावेश आहे. परंतु, कामगार मंत्रालयाच्या (Labor Ministry) सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, चारही नवीन श्रम संहितांमध्ये चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

२५ ऑगस्टपासून तिरुपती येथे सुरू होणाऱ्या कामगार मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील. राज्यांच्या कामगार मंत्र्यांच्या या परिषदेच्या अजेंड्यामध्ये चारही कामगार संहितांबाबत (New Labor Code) राज्य सरकारांकडून नियमांच्या मसुद्यावर चर्चा समाविष्ट आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयाच्या (Labor Ministry) सूत्रांनी दिली आहे.

मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मोबदला संहितेबाबत नियमांचा मसुदा तयार केला आहे. २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सामाजिक सुरक्षा संहितेबाबत नियम तयार केले आहेत. २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी औद्योगिक संबंध संहितेवर नियमांचा मसुदा तयार केला आहे आणि २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यावसायिक सुरक्षा संहितेवर नियमांचा मसुदा तयार केला आहे.

केंद्र सरकारला आशा आहे की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सर्व चार कामगार संहितांवर नियम तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. जेणेकरून ते देशभर लागू केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT