new parliament building differences from old structure lok sabha rajya sabha politics sakal
देश

New Parliament Building : लोकशाहीचे नवे मंदिर देशाच्या संसदेची झलक, सबसे अलग

देशाचे नवे संसदभवन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. वास्तूशास्त्राचा एक अनोखा अविष्कार येथे पाहायला मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे नवे संसदभवन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. वास्तूशास्त्राचा एक अनोखा अविष्कार येथे पाहायला मिळेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध वस्तू आणि सामग्रींनी मिळून हे नवे भवन तयार झाले असल्याने त्यामध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार तसेच कारागिरांनी विक्रमी वेळेमध्ये वास्तूच्या उभारणीचे काम पूर्ण केले आहे.

अशोकचक्र इंदूरवरून आले

अशोकस्तंभासाठीच्या उभारणीची सामग्री ही महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानातील जयपूर येथून मागविण्यात आली होती. लोकसभा आणि राज्यसभेच्या महाकाय भिंतींवर आणि संसदेच्या बाहेर लावण्यात आलेले अशोकचक्र खास इंदूरमधून मागविण्यात आले आहे. दगडांचे कोरीव काम आबू रोड आणि उदयपूर येथील मूर्तिकारांनी केले आहे. हे दगड राजस्थानातील कोटपूतली येथून आणण्यात आले आहेत. खास बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या विटा हरियाना आणि उत्तरप्रदेशातून मागविण्यात आल्या आहेत.

सगळ्या देशाचे प्रतिबिंब

नव्या संसद भवनामध्ये देशाची झलक पाहायला मिळेल. सभागृहातील जमिनीवर बांबूचे आच्छादन टाकण्यात आले असून त्यावरील वस्त्रप्रावरण हे मिर्झापूरमध्ये तयार करण्यात आलेले आहे. विविध ठिकाणांवर रंगरंगोटीसाठी वापरण्यात आलेले लाल आणि पांढऱ्या रंगाचे खडे राजस्थानातील सरमथुरा येथून आणण्यात आले आहेत. बांधकामाची वाळू चरखी दादरी येथून आणण्यात आली असून सभागृहातील अंतर्गत सजावटीसाठीचे सागवान लाकूड नागपूरहून मागविण्यात आले आहे.

मुंबईत तयार झाले फर्निचर

संसदभवनाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेला केशरी हिरव्या रंगाचा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाईट अजमेरजवळील लाखा येथून तर पांढऱ्या रंगाचे संगमरवर राजस्थानच्या अंबाजी येथून आणण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सीलिंगसाठी वापरण्यात आलेले स्टील दमण आणि दीव येथून आणण्यात आले आहे. संसदेतील सगळे फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले आहे. दगडांच्या जाळ्यांची कामे राजस्थानचे राजनगर आणि नोएडा येथे करण्यात आली आहेत.

नवे संसद भवन

  • बांधकामाचा कालावधी १० डिसेंबर २०२० ते २८ मे २०२३ सुमारे अडीच वर्षे

  • बांधकामाचा खर्च ९७१ कोटी

  • भूमीपूजन समारंभ - पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • निर्मिती - टाटा प्रोजेक्ट्‌स लि.

  • उद्‍घाटन समारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते

  • क्षेत्रफळ - ६४ हजार ५०० चौरस मीटर

  • वास्तुरचनाकार - एचसीपीएल डिझाईन, प्लॅनिंग ॲंड मॅनेजमेंट प्रा. लि.

आसन क्षमता

  • राज्यसभा - ३८४

  • लोकसभा - ८८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT