New Parliament 
देश

New Parliament: नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा ; उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण

कार्तिक पुजारी

Tricolour Hoisting at New Parliament

नवी दिल्ली- नवीन संसद भवनावर ध्वजारोहण करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते नव्या संसद भवनावर ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला हेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचा आज वाढदिवस आहे. शिवाय उद्यापासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने नवीन संसद भवनावर तिरंगा फडकवण्यात आला. सोमवारपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. पहिल्या दिवसाचे अधिवेशन संसदेच्या जुन्या इमातीतून होईल. त्यानंतर उरलेल्या चार दिवसांचे अधिवेशन संसदेच्या नवीन इमारतून होईल, असं सांगण्यात आलंय. त्यापूर्वी औपचारिकरीत्या नव्या संसदेवर ध्वजारोहण करण्यात आले.

उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही मुरलीधरण, यांच्यासह दोन्ही सभागृहातील पक्षांचे नेते कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत, असं कारण सांगण्यात आलं. त्यानंतर निमंत्रण उशीरा मिळाल्याने त्यांनी येण्याचं टाळल्याचं सांगितलं गेले. ध्वजारोहणावेळी काँग्रेसचे संसदीय गटाचे नेते अधीर रंजन चौधरी हे उपस्थित होते.

नवा ड्रेस कोड

नव्या संसद भवनात शिफ्ट होण्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. ध्वजारोहण झाल्याने आता अधिकृतरीत्या नव्या संसद भवनात शिफ्ट होता येणार आहे. विशेष म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. त्यामुळे संसदेतील कर्मचाऱ्यांना नवा गणवेश परिधान करावा लागणार आहे. या नव्या ड्रेस कोडवरुन काँग्रेसने टीकाही केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

Mumbai News: मुंबईत १९ हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्रांमध्ये केलेले बदल रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय, कारण काय?

Latest Marathi News Live Update : वृद्धाला मारहाण प्रकरणी मनसेचा परप्रांतीय चालकांना दणका

Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

SCROLL FOR NEXT