देश

PM मोदींची मोठी घोषणा; सेंट्रल विस्टा बांधणाऱ्या कामगारांचा होणार 'असा' सन्मान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच अचानकपणे सेंट्रल विस्टा प्रोजेक्टची पाहणी केली होती. सुमारे एक तास केलेल्या या पाहणीमध्ये त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला होता. तसेच उपस्थित कामगारांशी बातचित केली होती. याच कामगारांसंदर्भात आता पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की, संसदेची नवी इमारत संपूर्ण बांधून उभी राहिल्यानंतर या बांधकामाच्या कामात गुंतलेल्या सगळ्या कामगारांसाठी एक डिजीटल संग्रहालय स्थापन करणं आवश्यक आहे. यामध्ये त्यांची संपूर्ण माहिती जसे की, नाव, ते ज्या ठिकाणाशी संबंधित आहेत ते गाव, त्यांचा फोटो अशी माहिती असेल. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा सन्मान म्हणून हे उभं केलं जाईल. सगळ्या कामगारांना एक प्रमाणपत्र सुद्धा बहाल केलं जाईल. या ऐतिहासिक कामाच्या प्रयत्नात गुंतलेल्या सर्व कामगारांना त्यांच्या भूमिकेबद्दल आणि सहभागाबद्दल हे प्रमाणपत्र दिले जाईल. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, या सर्व कामगारांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी तसेच त्यांचे लसीकरण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

असा आहे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीचे भूमीपूजन झाले होते. भूमीपूजनानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली होती. सुमारे 64500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार असून यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. नव्या संसद भवनच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी 888 खासदारांसाठी आसनव्यवस्था असेल. याशिवाय राज्यसभा सदस्यांसाठी 326 हून अधिक आसन असणार आहेत. येथे 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे कार्यालयही या नवीन इमारतीत असेल. जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद सुमारे 17 हजार चौरस मीटर मोठे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्माकडून ODI कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर Shubman Gill ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, '२०२७ वर्ल्ड कपमध्ये...'

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Quick Mushroom-Spinach Omelette: हलक्या भूकेसाठी सोल्यूशन हवं आहे? मग ट्राय करा झटपट तयार होणारं मशरूम-पालक ऑम्लेट

Latest Marathi News Live Update : दलित असल्याचे सांगताच रुम नाकारली, वंचितच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

SCROLL FOR NEXT