देश

New Delhi : नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी गोव्याची माती वापरली जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आता गोव्याच्या मातीचा वापर होणार आहे. यासाठी गोव्यातील विविध भागातून गोळा केलेली माती दिल्लीत आणण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी शनिवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून ही माती स्विकारली आहे.

यासंदर्भात मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक ट्वीट केलं आहे. गोव्यातील वेगवेगळ्या प्रदेशातून गोळा केलेली गोवन माती नवी दिल्लीत उभारलेल्या नवीन संसदेच्या उभारणीसाठी योगदान देणार आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली आहे. नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली. पंतप्रधानांनी म्हटंले होते की, नवीन इमारत 'आत्मनिर्भर भारत' च्या व्हिजनचा एक अंगभूत भाग आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसंसद बांधण्याचा ऐतिहासिक प्रसंग असणार आहे. जे 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत.

11 जुलै 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण केले आहे. कांस्यपासून बनवलेला अशोकस्तंभ 6.5 मीटर उंच आहे. यादरम्यान पंतप्रधानांनी नवीन संसदेच्या उभारणीत गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Housing Society: १८ वर्षांपासून अडकलेला प्रश्न अखेर सुटला! हडपसरमधील गंगा व्हिलेजच्या ६७२ कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा, ऐतिहासिक क्षण

'तारक मेहता...' सेटवर इतका रडला 'बाघा' की, शूटिंग थांबवावं लागलं! नक्की काय घडलेलं?

Latest Marathi News Live Update : भाजप नेते प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला!

Delhi Tourism Initiative : ४ थी ते ६ वीच्या विद्यार्थ्यांना फिरता-फिरता मिळणार बक्षीसं ! जाणून घ्या दिल्ली पर्यटन विभागाचा 'हेरिटेज पासपोर्ट' उपक्रम

Pune Water Leakage: दिवसाआड पाणी मिळते, पण इथे हजारो लिटर पाणी रस्त्यावर! पुण्यातील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT