Driving Licence Test Sakal
देश

आता RTO मध्ये जाऊन Driving Licence Test देण्याची गरज नाही

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे लायसन्स मिळवण्यासाठी यापुढे तुम्हाला आरटीओमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्राने बदल केलेल्या नव्या नियमांनुसार, चालकाला आरटीओ कार्यालयात (RTO Office) जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट (No Driving Licence Test) देण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले असून, हे नियम लागू देखील झाले आहेत.

प्रमाणपत्रानंतर मिळणार लायसन्स

यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरओटीमध्ये वाहन टेस्टची वाट पाहावी लागणार नसून, तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. यासाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागणार असून, त्याठिकाणी टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे. टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर अर्जदारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाणार आहे. दरम्यान, मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलसाठी सबंधित मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी जाहीर केल्या आहेत.

1. अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी ट्रेनिंग सेंटर्सकडे किमान एक एकर जागा आहे, मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी ट्रेनिंग सेंटर्ससाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.

2. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.

3. मंत्रालयाने एक अध्यापन अभ्यासक्रम देखील विहित केला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम थेअरी आणि प्रॅक्टिकल असा 2 भागांमध्ये विभागला जाईल.

4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतार इत्यादींवर गाडी चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतात. थेअरीचा भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, त्यात रस्ता शिष्टाचार समजून घेणे, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT