देश

हॉटेल उद्योगासाठी नवे नियम; पर्यटन मंत्रालयाकडून मसुदा तयार

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर उद्योग सुरू होताना सर्वांच्या सुरक्षेसाठी काही नियम सरकार घालून देणार असल्याचे स्पष्ट आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने हॉटेल आणि निवास सेवा देणाऱ्या इतर व्यवसायांसाठी मार्गदर्शक तत्वांचा मसुदा तयार केला आहे. सामाजिक अंतर आणि इतर उपाय असलेल्या या मसुद्यावर प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालय आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या सूचनांनुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्राकडून प्रतिक्रिया आल्यानंतर अंतिम नियम प्रसिद्ध केले जाणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यांच्याकडून मागविल्या प्रतिक्रिया 
- हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया 
- फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया 
- कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री 
- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री 

कशासंदर्भात असतील सूचना 
- ग्राहकांची कोरोनाबाबत माहिती ठेवणे 
- चेक इन आणि चेक आउट बाबत नवे नियम 
- परिसर स्वच्छता 
- भोजन पुरविण्याबाबत नियम 
- ग्राहक आणि हॉटेल कर्मचारी यांच्यासाठी नियम 

नवीन नियम कशासाठी? 
- सामाजिक सुरक्षेचा नियम कायमस्वरूपी पाळला जावा 
- संसर्ग झालाच तर ग्राहकांचा शोध आणि संसर्गाचा स्रोत सहज समजावा 
- ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात कमीत कमी संपर्क यावा 

कसे असतील नियम 
- ग्राहकांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप हवे 
- कॅशलेस पेमेंटला प्राधान्य 
- खोकला किंवा ताप असलेल्या ग्राहकांना प्रवेश देताना त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे 
- त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे 
- कोरोना हेल्पलाईनशी संपर्क साधणे 
- ते रहात असलेली जागा पुर्ण स्वच्छ ठेवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT