देश

मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा, झोमॅटो प्रकरणाला नवीन वळण

सकाळन्यूजनेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचं नाक तोडल्याच्या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये तरुणीने ऑर्डर रद्द केल्यानं चिडल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं तिला मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली होती. कामराज असं त्याचं नाव असून सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कामराजला अटक केली होती. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून आरोप करणाऱ्या हितेशा चद्रानीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

डिलिव्हरी बॉय कामराज याच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या मॉडेल आणि मेकअप कलाकार हितेशा चंद्रानी हिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामराज याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३५५, कलम ५०४ आणि कलम ५०६ असे अनुक्रमे हल्ला, अपमान आणि धमकी या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल केली आहे. बेंगळुरुमधील शहर पोलीस स्थानकात डिलिव्हरी बॉय कामराजने तक्रार दाखल केली आहे.

गेल्या आठवड्यात हितेशा चंद्रानी हिने झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. हितेशा हिने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्यावर झालेल्या हल्याचं वर्णन केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात झोमॅटो कंपनी आणि कर्मचारी कामराजवर देशभरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर  डिलिव्हरी बॉय कामराजनेही प्रसारमाध्यमांना आणि एका व्हिडीओच्या माध्यमातून. आपली बाजू मांडत आपल्याला कसं खोटं पाडलं जातंय आणि कसा बळीचा बकरा केला जातोय याची कथा मांडली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT