देश

गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट मोदींकडून लाँच; 10,000 कोटींची गुंतवणूक

नामदेव कुंभार

Vehicle Scrappage Policy Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी गाड्यांची स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच केली आहे. अहमदाबादमधील इन्व्हेस्टर समिटला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोंदींनी संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदाबाद येथे कार्यक्रमस्थळावर उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाच या पॉलिसीची घोषणा केली होती.

स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास लाँचिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. स्क्रॅपिंग पॉलिसीअंतर्गत देशभरात जवळपास 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान व्यक्त केली. Re-use, Recycle आणि Recovery या तीन त्वावर स्क्रॅपिंग पॉलिसी चालेल, अन् भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार आहे, असं मोदी म्हणाले. स्क्रॅपिंग पॉलिसी ही भारताच्या मोबालिटी आणि ऑटो स्केटरला नवीन दिशा देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

यावेळी ते म्हणाले की, 'मोबालिटीचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा हिस्सा आहे. आर्थिक विकासासाठी याची भूमिका सर्वात महत्वाची आहे. नव्या स्क्रॅपिंग पॉलिसीचा 'वेस्ट टू वेल्थ'चा मंत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेईल. पुढील 25 वर्षे देशासाठी अतिशय महत्वाची आहेत. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान बदलत आहे, त्यानुसार आपल्यालाही बदल करणं गरजेचं आहे. आपण, सध्यावातावरणाच्या बदलाच्या संकटाला सामोरं जात आहोत. त्यामुळे स्क्रॅपिंग पॉलिसीसारखं पाऊल उचलावं लागेल.'

स्कॅप पॉलिसीचे फायदे...

स्क्रॅप करण्याच्या गाडीचे एक सर्टिफिकेट मिळेल. यामुळे नवीन गाडी खरेदी करताना तिचे रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्सवर सूट दिली मिळेल. जुन्या गाडीचा मेन्टेनन्स जास्त असतो. रिपेअर कॉस्ट, फ्युअल इफिशिअन्सी याद्वारे पैसे खर्च होतात. ते वाचतील. कंपन्यांनी आर अँड डी ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपला सहभाग वाढवावा. यासाठी जी मदत लागेल ती सरकार देण्यास तयार आहे, असे आश्वासनही मोदी यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT