new weapon systems branch approved for iaf air chief marshal v r chaudhari sakal
देश

हवाई दलात शस्त्रप्रणालीची शाखा; एअरचीफ मार्शल विवेक राम चौधरी

एअरचीफ मार्शल चौधरींची माहिती: पुढील वर्षीपासून अग्निवीरांची भरती

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेगळी शस्त्रप्रणालीची शाखा तयार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून यामुळे हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षणावरील ३ हजार ४०० कोटी रुपये वाचतील, असा विश्वास हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांना सामावून घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय हवाई दलाच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त येथील हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले.

चौधरी म्हणाले की, ‘‘ बहुआयामी मोहिमा या अधिक लवचिक, ठोस स्वरूपाच्या असणे गरजेचे आहेत. यामध्ये निरर्थक आदेश आणि नियंत्रणाला स्थान असता कामा नये त्यामुळे सुरक्षा दलांना संयुक्तपणे काम करता येईल. कोणतीही एक आघाडी युद्ध जिंकू शकत नाही. सध्या तिन्ही सेनादलांमध्ये एकसंधता आणण्याचे काम सुरू आहे.’’ यावेळी हवाई दलातील कर्मचाऱ्यांसाठीच्या नव्या गणवेषाचेही चौधरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शस्त्रप्रणालीची शाखा सध्या आपल्याकडे असलेल्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रांची देखरेख करण्याचे काम करेल.

पारंपरिक शस्त्रांच्याऐवजी सहजपणे वेगाने हाताळता येणाऱ्या शस्त्रांची निर्मिती करणारे तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारावे लागेल. मागील वर्षभरामध्ये युद्ध लढण्याच्या रणनीतीमध्येही आमूलाग्र बदल झाला आहे. नव्याने तयार होणाऱ्या शाखेमध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर काम केलेले अनुभवी मनुष्यबळ असेल त्यामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, दूरवरून ज्यांच्यावर सहज नियंत्रण ठेवता येते अशा विमानांची हाताळणी करण्याचा अनुभव असणाऱ्या लोकांचा समावेश असेल, असे चौधरी यांनी सांगितले. आजच्या या सोहळ्यामध्ये चौधरी यांनी हवाई दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अनेक चित्तथरारक प्रात्याक्षिकेही सादर केली. या कार्यक्रमास हवाई दलातील अन्य कर्मचारीही उपस्थित होते.

चौधरी म्हणाले

  • निर्णय प्रक्रियेतील वेगासाठी ‘एआय’चा वापर

  • अग्निपथ आव्हानात्मक पण तरुणांसाठी संधी

  • अग्नीवीरास पहिल्याच टप्प्यात योग्य प्रशिक्षण

  • डिसेंबरमध्ये तीन हजार अग्नीवीर वायूंना प्रशिक्षण

  • हवाई दलाने अनेक आघाड्यांवर काम केले

  • युद्ध जिंकण्यासाठी दृष्टिकोन बदलावा लागेल

  • सुरक्षा दलेही आत्मनिर्भर, मेक इन इंडिया योग्य पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT