New Zealand was declared free from coronavirus 
देश

भल्या भल्यांना जमलं नाही ते न्यूझिलंडने करुन दाखवलं; देश कोरोनामुक्त?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- कोरोना विषाणूने जगात असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक देश या विषाणूपुढे हतबल झाले आहेत. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला तर covid-19 ने हैराण करुन सोडले आहे. सर्व देश या कोरोना विषाणूला हरवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिनसागणिक वाढत आहे. असे असताना न्यूझिलंड या देशातून एक चांगली बातमी आली आहे. न्यूझिलंडने देशाला कोरोनामुक्त म्हणून घोषीत केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रविवारी देशामध्ये एकही नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला नाही. त्यामुळे न्यूझिलंडने कोरोना विषाणूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं दिसत आहे. न्यूझिलंडमध्ये 28 फेब्रुवारी 2020 रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर देशाने याची गंभीर दखल घेत योग्य उपाय योजना राबवल्या होत्या. त्याचे फळ देशाला आज मिळत आहे.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा 
-----------
सोनू सूदने मातोश्रीवर; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा
-----------
गेल्या 48 तासात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती ऑकलंड रिजनल पब्लिक हेल्थने आरोग्य मंत्रालयाला दिली आहे. एका 50 वर्षीय महिलेला शेवटची कोरोनाबाधित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 48 तासात या महिलेमध्ये  covid-19 ची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, असं ऑकलंडमधील मार्गारेट रुग्णालयाने सांगितलं आहे. त्यामुळे न्यूझिलंडने देशाला कोरोना मुक्त म्हणून घोषीत केले आहे.

न्यूझिलंडमध्ये आतापर्यंत 1504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 22 जणांचा बळी गेला आहे, तर उर्वरित लोक ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या न्यूझीलंडमध्ये एकही सक्रीय कोरोना रुग्ण नाही. 

न्यूझिलंडच्या पंतप्रझान जॅकिंडा आर्डर्न यांनी ज्यप्रकारे देशातील परस्थिती हाताळली, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. देशात पहिला कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणा सक्रीय केली. वेळोवेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांची जनजागृती केली. तसेच कोरोना विषाणूला न घाबरण्याचं आवाहन केलं. चार महिन्यांच्या नियंत्रित टाळेबंदीच्या जोरावर जॅकिंडा यांनी कोरोवार मात केली आहे. न्यूझिलंडमध्ये जनजीवन आता कोवोड-19 पूर्वी जसं चालत होतं त्याप्रमाणे चालत आहे.

देशाने चांगले काम करुन दाखवले आहे. निसंशय आपण असामान्य यश मिळवलं आहे. त्यामुळे धन्यवाद, न्यूझिलंड, अशी प्रतिक्रिया जॅकिंडा आर्डर्न यांनी कोरोनावर मात केल्यानंतर दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

Pune Bengaluru Highway: गणपती बाप्पांना निरोप अन् परतीच्या प्रवासात कोंडी! आनेवाडी टोलवर ५ किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT