child vaccination 
देश

नवजात बालकांचं होणार न्युमोनियापासून संरक्षण; Biological E च्या लशीची शिफारस

PCV 14 ही लस 6, 10 आणि 14 आठवडे वयाच्या लहान मुलांना दिले जाऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नवजात बालकांचं आता जीवघेण्या न्युमोनियापासून संरक्षण होणार आहे. त्यासाठी बायोलॉजिकल-ई कंपनीनं बनवलेल्या खास लशीला परवानगी देण्याची शिफारस विषय तज्ज्ञ समितीनं (CDSCO) केली आहे. १४ वॅलेंट न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन नामक ही लस आहे. (Newborns will be protected from pneumonia approval of Biological E vaccine by CDSCO)

काय आहे ही न्युमोनियावरील लस?

न्यूमोकोकल लशीची निर्मिती त्या जीवाणूजन्य सिरोटाईप सुरक्षेसाठी करण्यात येतो ज्यामुळं न्यूमोनियासारख्या आजार होतात. ० ते १ वर्षापर्यंतच्या तान्ह्या बाळांना जास्त करुन न्युमोनियाचा आजार होतो. ज्यामुळं १६ टक्के अधिक मुलांचा या आजारामुळं मृत्यू होतो. न्युमोनियामधील सिरो टाईपमुळं लहान मुलांमध्ये वेगानं पसरणाऱ्या गंभीर न्यूमोकोकल संक्रमण अर्थात मैनिन्जाइटिस, बेक्टीरेमिक, सेप्टीसिमिया हा निमोनिया होतो. यापासून बचावासाठी न्यूमाकोकल लस दिली जाते.

क्लिनिकल चाचण्या आणि DCGI मान्यता

हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई कंपनीनं गुरुवारी सांगितलं की, SEC नं अर्भकांच्या क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील डेटाची तपासणी केली आणि मंजूरी दिली. तसेच सिंगल आणि डबल डोस सादरीकरणांमध्ये एस. न्यूमोनिया संसर्गाविरूद्ध 14 व्हॅलेंट बालरोग लसीच्या निर्मितीसाठी शिफारस केली. PCV 14 ही लस 6, 10 आणि 14 आठवडे वयाच्या लहान मुलांना दिले जाऊ शकते.

भारतात महत्त्वाची जीवनरक्षक लस उपलब्ध

बायोलॉजिकल-ई च्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दतला यांनी म्हटलं की, "BE's PCV14 जगभरातील लाखो नवजात बालकांची सुरक्षा करेल आणि आक्रमक न्यूमोकोकल रोगाच्या प्रतिबंधात योगदान देईल. SEC च्या या शिफारसीसह आणि त्यानंतर DCGI कडून अपेक्षित औपचारिक मान्यता मिळाल्याने, भारताकडे बालरोगाच्या वापरासाठी आणखी एक महत्त्वाची जीवनरक्षक लस उपलब्ध होईल.’’ बायोलॉजिकल ई. ची ही लस जागतिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी WHO आणि इतर जागतिक नियामक संस्थांसोबत काम करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया संसर्ग

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया संसर्ग हे भारतात आणि विकसनशील देशांमध्ये 5 वर्षांखालील बालमृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. PCV14 लसीसह, BE 'होप्स’ आक्रमक न्यूमोकोकल आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी योगदान देईल आणि जागतिक स्तरावर लाखो जीवांचं रक्षण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT